Share

IND vs ENG : ऋषभ पंतचा शतकी तडाखा अन् हार्दिक पंड्याची अष्टपैलू खेळी; भारताचा ५ गडी राखून विजय

Published On: 

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेत २-१ ने बाजी मारली. आगोदर टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारली होती. त्यानंतर आता भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतही दमदार कामगिरी करत इंग्लंडला धूळ चारली. शेवटच्या निर्णायक सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांच्या धडाकेबाज कामगिरीच्या बळावर भारताने दिमाखदार विजय मिळवला. सामन्यात ऋषभ पंतने १२५ धावांची शतकीय खेळी खेळली. या खेळीसाठी ऋषभ पंतला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला.

भारताचा डाव

इंग्लंड संघाने दिलेल्या २५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन (१ धाव ) रोहित शर्मा (१७ धावा) हे लवकरच बाद झाले. यानंतर विराट कोहली मोठी खेळी वाटत असतानाच तो १७ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले आणि तो १६ धावांवर बाद झाला. यानंतर भारताच्या विजयाच्या दिशेने सुरुवात झाली. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी भारताच्या विजयाची नोंद केली. सामन्यात ऋषभ पंतने २ षटकार आणि १६ चौकारांच्या साहाय्याने १२५ धावांची नाबाद शतकीय खेळी खेळली. याव्यतिरिक्त हार्दिक पंड्याने १० चौकारांच्या साहाय्याने ७१ धावांची दमदार खेळी खेळली. या दोघांच्या खेळीच्या बळावर भारताने इंग्लंडला धूळ चारली. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेत २-१ अशी बाजी मारली.

इंग्लंडचा डाव

सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने आल्याने इंग्लंडला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. इंग्लंडकडून सलामीवीर जेसन रॉय (४१ धावा), बेन स्टोक्स (२७ धावा), कर्णधार जोस बटलर (६० धावा ), मोईन अली (३४ धावा), लिया लिविंगस्टोन (२७ धावा) आणि क्रेग ओव्हरटन (३२ धावा) यांनी उपयुक्त खेळी खेळल्या. तर सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांना खातेही उघडता आले नाही. दोघेही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाले. भारताकडून हार्दिक पंड्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने २४ धावांत ४ गडी बाद केले. तर फिरकीपटू युझवेंद्र चहलने ३ गडी बाद केले. मोहम्मद सिराजला दोन गडी बाद करण्यात यश आले. रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!