Share

IND vs ENG : हार्दिक पंड्याच बेस्ट! दमदार बॉलिंगमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव

Published On: 

मुंबई : भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा संघ २५९ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात इंग्लंड संघाला कमी धावसंख्येवर रोखण्यात हार्दिक पंड्याची मोठी भूमिका आहे. त्याने या सामन्यात इंग्लंडच्या ४ फलंदाजांना तंबुत पाठवले. हार्दिकने यादरम्यान तब्बल ३ निर्धाव षटके टाकली. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाला जसप्रीत बुमराहची उणीव भासू दिली नाही. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीतील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्याच्या कामगिरीबाबत बोलताना त्याच्या फिटनेस आणि गोलंदाजीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्याने अष्टपैलू क्षमता गमावली असून केवळ फलंदाज म्हणून त्याचा संघात समावेश करणे योग्य नाही, असे सांगण्यात येत होते. २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. मात्र त्याला या स्पर्धेत गोलंदाजी करता आली नव्हती. यानंतर भारतीय निवड समितीवर तसेच हार्दिकवर बरीच टीका झाली. त्याला पुन्हा फिटनेस मिळवण्यासाठी एनसीएमध्ये पाठवण्यात आले होते. यानंतर हार्दिक फिटनेसवर काम केले आणि आयपीएल २०२२ मध्ये अप्रतिम कामगिरी केली. हार्दिकने कर्णधाराच्या भूमिकेतही गुजरातला आयपीएलचा चॅम्पियन बनवले.

तिन्ही प्रकारात इंग्लंडमध्ये सर्वोत्तम कामगिरी

हार्दिक पंड्याने इंग्लंडमधील वनडे सामन्यात पहिल्यांदा चार विकेट घेतल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हार्दिक पंड्याने या दौऱ्यावर इंग्लंडविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. कसोटी सामन्यात त्याने एका डावात २८ धावांत ५ बळी घेतले होते, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली होती. इंग्लंड विरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याने ३३ धावांत ४ बळी घेतले होते, जी त्याची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी होती. आता त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याने आजच्या सामन्यात इंग्लंड विरुध्द २४ धावांत ४ बळी घेतले आहेत.

शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाने ४५.५ षटकात २५९ धावा केल्या होत्या. या सामन्यात हार्दिक पंड्याशिवाय युझवेंद्र चहलने ३ बळी घेतले. चहल थोडासा महागडा ठरला कारण त्याने ९.५ षटकांत ६० धावा दिल्या. मोहम्मद सिराजने ९ षटकांत ६६ धावांत २ तर रवींद्र जडेजाने ४ षटकांत २१ धावांत १ बळी घेतला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!