🕒 1 min read
मुंबई : इंग्लंडविरुद्धचा अंतिम एकदिवसीय सामना खेळल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुढील एक महिना विश्रांती घेणार आहे. त्याने एक महिना क्रिकेटपासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात कोहली लंडनमध्ये कुटुंबासह राहणार आहे. पत्नी अनुष्का आणि त्यांची मुलगी आधीच तिथे आहेत. आता कोहलीची आईही लंडनला त्यांच्याकडे जाणार आहे. कोहली आशिया चषकासाठी भारतीय संघातून मैदानात खेळताना दिसेल. कारण महिनाभर तो क्रिकेटपासून पूर्णपणे दूर असणार आहे.
इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, कोहलीची आई लंडनला जाणार आहे. आशिया चषकापूर्वी लंडनमध्येच कोहली कुटुंबासोबत विश्रांती घेणार आहे. खराब फॉर्ममुळे कोहलीने काही काळ मैदानाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला असावा. मात्र, कोहलीला विश्रांती देण्याच्या निर्णयावरही काही तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मैदानाबाहेर राहिल्यास कोहलीचा फॉर्म येणार नाही, असे त्याचे म्हणणे आहे. खेळत राहूनच तो फॉर्ममध्ये परत येऊ शकतो. पण विराट कोहलीलाही आपले लक्ष क्रिकेटपासून पूर्णपणे दूर ठेवायचे आहे. कोहलीने लंडनमध्ये पत्नीसह भजन-कीर्तनातही सहभाग घेतला होता. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहली भारतीय संघात नाही. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी आधीच भारतीय संघ जाहीर केकेला आहे.
इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या कसोटीसह मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये कोहलीची धावा काढता आल्या नाहीत. त्यामुळे विराटवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची संख्याही वाढली. मात्र, या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह अनेकजण त्याच्या समर्थनात उतरले आहेत. या कठीण परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याचा सल्ला बाबर आझमने विराटला दिला आहे. आता ब्रेकनंतर पुनरागमन केल्यावर कोहलीच्या खेळात कोणते बदल पाहायला मिळतात हे पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरेल.
Perspective pic.twitter.com/yrNZ9NVePf
— Virat Kohli (@imVkohli) July 16, 2022
इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत विराट कोहलीची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. त्याच्या या खराब कामगिरीमुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विराटने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे शतक २०१९ मध्ये झळकावले होते. त्यानंतरच्या तीन वर्षात आतापर्यंत त्याला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. विराटचा हा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंताजनक ठरत आहे. आगामी काळातील आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये विराट सारख्या खेळाडूचा भारताच्या यशामध्ये खूप मोठा वाटा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी NDA कडून जगदीप धनखर यांच्या नावाची घोषणा
- Virat kohli : बाबर आझमने केलेल्या समर्थनार्थ ट्विटला विराट कोहलीने दिले ‘असे’ उत्तर, म्हणाला…
- kishori Pednekar | उद्धव ठाकरे यांचे निर्णय चुकीचे असल्याचं भासवलं जातंय- किशोरी पेडणेकर
- IND vs ENG : ख्रिस गेलनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा रोहित शर्मा ठरेल जगातील पहिला फलंदाज; वाचा!
- Vijay Wadettiwar | “तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवून…”; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
