Share

Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी NDA कडून जगदीप धनखर यांच्या नावाची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप कडून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता सगळ्यांना उपराष्ट्रपती पदासाठी भाजप कोणती रणनीती आखणार असा प्रश्न पडला होता. दरम्यान भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून जगदीप धनखर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या मुख्यालयात पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. त्यानंतर बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांना उपराष्ट्रपतीपदासाठी नामांकन देण्यात आले आहे.

आजच धनखर यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. पीएमओने पीएम मोदी आणि धनखर यांचा फोटोही ट्विटरवर पोस्ट केला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी धनखर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. तत्पूर्वी, बैठकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह पक्षाचे अनेक दिग्गज नेते पोहोचले होते. याअगोदर उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी अनेक नावांची चर्चा होत होती, मात्र नेहमीप्रमाणे यावेळीही भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

भाजपची आणखी एक राजकीय खेळी

बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांना एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी मुख्तार अब्बास नक्वी, नजमा हेपतुल्ला आणि केरळचे राज्यपाल यांच्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र भाजपने बंगालच्या राज्यपालांना उपराष्ट्रपती पदासाठीचा चेहरा बनवले आहे. यापूर्वी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. तेव्हाही भाजप एवढ्या मोठ्या पदासाठी आदिवासी चेहऱ्याची घोषणा करेल याची कोणालाही कल्पना देखील नव्हती.

रविवारी विरोधी पक्ष घोषणा करतील

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, रविवारी सर्व विरोधी पक्षांची बैठक होईल आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी संयुक्त उमेदवाराच्या नावावर चर्चा होईल. विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली असून नामांकनाची अंतिम तारीख १९ जुलै आहे. ६ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!