Share

Virat kohli : बाबर आझमने केलेल्या समर्थनार्थ ट्विटला विराट कोहलीने दिले ‘असे’ उत्तर, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचे समर्थन करत एक ट्विट केले होते. या ट्विटद्वारे बाबर आझमने कोहलीला खंबीरपणे उभे राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता बाबर आझमच्या या ट्विटला विराट कोहलीनेही उत्तर दिले आहे. आझमच्या ट्विटला विराट कोहलीने उत्तर दिले की, धन्यवाद, चमकत राहा आणि पुढे जा. मी तुम्हाला यश इच्छितो. विशेष म्हणजे बाबर आझमनेही ट्विट करताना विराट कोहलीच्या कठीण काळाबद्दल म्हटले होते की, ही वेळही निघून जाईल, फक्त मजबूत रहा.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली १६ धावा काढून बाद झाला. यानंतर बाबर आझमने ट्विट करत विराट कोहलीचे समर्थन केले होते. या ट्विटला दोन दिवसांनी आपले उत्तर देताना कोहलीने बाबर आझमचे आभार मानले आहेत.

मागील काही काळापासून विराट कोहलीची बॅट अपेक्षेप्रमाणे धावा काढत नाहीय. तो सध्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. खराब कामगिरीतून जाण्याचा असा प्रकार अनेक क्रिकेटपटूंसोबत घडला आहे. कोहलीही या अडचणीतून बाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी पुढील एक महिना विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो लंडनमध्ये आपल्या कुटुंबासह वेळ घालवणार आहे. या काळात तो खेळाच्या मैदानापासून पूर्णपणे दूर राहणार आहे. विराट कोहलीची आई देखील त्याच्यासोबत राहणार आहे. आगामी काळातील आशियातील क्रिकेटसाठी तो पुन्हा मैदानात उतरणार आहे. सध्या या इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर कोहली संघासोबत दिसणार नाही.

इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत विराट कोहलीची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. त्याच्या या खराब कामगिरीमुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विराटने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचे शतक २०१९ मध्ये झळकावले होते. त्यानंतरच्या तीन वर्षात आतापर्यंत त्याला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. विराटचा हा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंताजनक ठरत आहे. आगामी काळातील आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये विराट सारख्या खेळाडूचा भारताच्या यशामध्ये खूप मोठा वाटा असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!