🕒 1 min read
मुंबई : श्रीलंका देश सध्या अतिशय वाईट टप्प्यातून जात आहे. या देशात आर्थिक संकटामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडला आहे. श्रीलंकेतील सामान्य जनजीवन विस्कळित झाल्याने अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. देशात परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे. विशेषत: खाद्यपदार्थांसह इंधनाचीही तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. लोकांना पेट्रोलसाठी दोन दिवस वाट पाहावी लागत आहे. कोणी श्रीमंत असो की गरीब सगळ्यांनाच रांगेत उभे राहावे लागत आहे. श्रीलंकेचा क्रिकेटपटू चमिका करुणारत्नेला कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी या समस्येचा मोठा सामना करावा लागला. तब्बल २ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना पेट्रोल मिळाले. यावरून श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेलसाठी सर्वसामान्यांना किती त्रास सहन करावा लागत असेल याचा अंदाज लावता येईल.
चमिका करुणारत्नेने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. एएनआय या वृत्तसंस्थेशी विशेष संवाद साधताना त्याने देशातील सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. इंधनाच्या संकटावर करुणारत्ने म्हणाला की, “२ दिवस लांब रांगेत थांबल्यानंतर मी नशीबवान आहे की मला पेट्रोल मिळाले. सध्या देशात इंधनाचे मोठे संकट आहे. माझा यातच सगळा वेळ जातो. त्यामुळे मला सरावाला जाता येत नाही. १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंकेने एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही इंधन आणि आर्थिक संकट पाहिलेले नाही. परिस्थिती अशी आहे की देशातील केवळ १० टक्के लोकांनाच इंधन मिळत आहे.”
श्रीलंकेकडे आशिया चषकाचे यजमानपद
यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेला मिळालेले आहे. ही स्पर्धा ऑगस्टमध्ये खेळवली जाणार आहे. पण श्रीलंकेला स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशात इंधनाची तीव्र टंचाई आहे. पुढे काय होणार हे करुणारत्नेलाही माहीत नाही. तो म्हणाला की, “लंका प्रीमियर लीग आणि दोन महत्त्वाच्या मालिका सामन्यांची घोषणा होत असताना मी अशा पेट्रोलसाठी रांगेत उभे आहे.”
India is like brother to us, helping us a lot: Sri Lankan cricketer Karunaratne amid ongoing crisis
Read @ANI Story | https://t.co/V15usnz5MO#ChamikaKarunaratne #SriLankaCrisis #SriLanka pic.twitter.com/Nk0ndtbgYz
— ANI Digital (@ani_digital) July 16, 2022
पेट्रोल भरण्याच्या समस्येमुळे सराव हुकला
तो पुढे म्हणाला की, “आशिया कप होणार आहे आणि लंका प्रीमियर लीगही खेळली जाणार आहे. मला माहित नाही काय होईल, कारण मला सरावासाठी आणि क्लब सीझनमध्ये भाग घेण्यासाठी कोलंबो आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये जावे लागेल. इंधनाअभावी मला सरावाला जाता येत नाही. दोन दिवस मी कुठेही गेलो नाही कारण मी गाडीत पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगेत उभा आहे. सुदैवाने आज मिळाले पण दहा हजार रुपयांना. हे देखील जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस टिकेल. असे असले तरी आशिया चषकासाठी तो आणि श्रीलंकेचा संघ सज्ज होईल, असा विश्वास करुणारत्नेला वाटतो.
ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंका दौऱ्यावर आला होता
श्रीलंकेने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत यजमानपद भूषवले होते. दोन्ही देशांमध्ये टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळल्या गेल्या. एकदिवसीय मालिका श्रीलंका आणि टी-२० मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली. तर २ कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena and bjp : शाहाजी बापू पाटील यांचा कानमंत्र! सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हसून-हसून लोटपोट
- Gopichand Padalkar | “शरद पवार कधी घरात बसतात आणि मी…” ; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला
- Sanjay Raut : “शिवसेनेच्या पंखाखाली राहून स्वाभिमान जपू नये…”, संजय राऊतांचे बंडखोर आमदारांना आव्हान
- IND vs ENG : विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत पोहोचला रामाच्या दरबारात; पाहा PHOTO
- Sushmita Sen and Lalit Modi | सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या रिलेशनशिपवर हर्ष गोयंका म्हणतात, “मोदी है तो मुमकिन है”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
