🕒 1 min read
मुंबई : अनेक भारतीय तसेच विदेशी दिग्गज सध्या विराट कोहलीबाबत मत व्यक्त करत आहेत. विराटच्या खराब फॉर्ममुळे त्याच्या जागी युवा खेळाडूला भारतीय संघात संधी द्यायला हवी, असे कपिल देव यांच्यासह अनेकांनी म्हटले आहे. तो सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात विराटला ५ डावात एकदाही २० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. दरम्यान, त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तो पत्नी अनुष्का शर्मासोबत भजन कीर्तनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेला दिसत आहे. भारताचा इंग्लंड दौरा १७ जुलै रोजी होणार्या तिसर्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यासह संपणार आहे. दोन्ही संघ सध्या या एकदिवसीय मालिकेत १-१ अशा बरोबरीत आहेत.
अमेरिकन गायक कृष्ण दास यांनी लंडनमध्ये भजन-कीर्तनाचे आयोजन केले होते. यापूर्वीही ते असे कार्यक्रम आयोजित करत आले आहेत. यादरम्यान कोहली आणि अनुष्काही तेथे पोहोचले. कृष्ण दास यांच्या शिष्यांपैकी एक हनुमान दास यांनी फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट आणि अनुष्का दिसत आहेत. हनुमान दास यांनी सांगितले की, दोघेही कार्यक्रमाला उपस्थित होते. येथे तासनतास रामाच्या नावाने कार्यक्रम चालला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यात भाविक भक्तीत लीन झालेले दिसतात.
https://www.instagram.com/p/CgAyruXt2kS/?igshid=YmMyMTA2M2Y=
तिसऱ्या निर्णायक सामन्यात ठरणार मालिकेचा विजेता
मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये या मैदानावर आतापर्यंत ४ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाने केवळ एकच सामना जिंकला आहे. यजमान इंग्लंड संघ तीन सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. उभय संघांमधील शेवटचा एकदिवसीय सामना या मैदानावर २००७ मध्ये झाला होता. त्या सामन्यात इंग्लंडने ३ गडी राखून विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला केवळ २०७ धावा करता आल्या तर इंग्लंडने ४८ षटकांत ३ गडी राखून लक्ष्य गाठले होते.
नवा कर्णधार जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा टॉप ऑर्डर अजूनही संघर्ष करत आहे. पहिल्या ३ टी-२० आणि नंतर दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांच्या बळावर संघाला १०० धावांनी विजय मिळवण्यात यश आले होते. या सामन्यात इंग्लंडकडून एकही फलंदाजाने अर्धशतक झळकावले नव्हते.
महत्वाच्या बातम्या :
- Sushmita Sen and Lalit Modi | सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या रिलेशनशिपवर हर्ष गोयंका म्हणतात, “मोदी है तो मुमकिन है”
- Amol Mitkari : “… पद्धत छत्रपती संभाजी महाराजांना तरी आवडली असती का”, अमोल मिटकरींचा टोला
- Amol Mitkari : “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आपले सरकार ताम्रपट घेऊन…”, राष्ट्रवादीचा शिंदे सरकारला टोला
- Cabinet Decision | औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण ; मुख्यमंत्र्यांची माहिती
- Raj Kundra | राज कुंद्रा करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण; तुरुंगातील अनुभव पडद्यावर दाखवणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
