Share

Shivsena and bjp : शाहाजी बापू पाटील यांचा कानमंत्र! सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हसून-हसून लोटपोट

Published On: 

सांगली: “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, सगळं ओक्केमध्ये” या डायलॉगने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. सांगोल्याचे आमदार शाहाजी बापू पाटील यांच्या कॉल रेकॉर्डिंगमधून हे वाक्य ऐकायला मिळाले होते. राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना या एका डायलॉगने प्रत्येक घराघरात हास्य निर्माण केले. सोशल मीडियावर या डायलॉगचे हजारो मिम्स व्हायरल झाले. तसेच अनेकांनी त्यावर रील्स बनवले. ते कॉल रेकॉर्डिंग व्हायरल व्हायच्या अशी क्वचितच लोकांना माहित असलेले शाहाजी बापू हे प्रसिद्धीच्या झोतात आले. शाहाजी बापू यांचा असाच एक नवीन व्हिडीओ समोर येत आहे. ज्यात शाहाजी बापू पाटील यांच्यासह, आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत हे देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहेत.

व्हिडीओमध्ये शाहाजी बापू पाटील हे सदाभाऊ खोत यांच्या कानात काहीतरी सांगतात, त्यावर सदाभाऊ जोरजोरात हसायला लागतात. त्यानंतर शाहाजी बापू हे गोपीचंद पडळकर यांना देखील काहीतरी सांगतात आणि ते देखील हसायला लागतात. आता शाहाजी बापूंनी त्यांच्या कानात काय सांगितले असेल, कोणता कानमंत्र दिला असेल, हे तर ठाऊक नाही. मात्र याची चर्चा सगळीकडे सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!