🕒 1 min read
मुंबई : विराट कोहलीच्या खराब कामगिरीबाबत सध्या क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. अगोदर कसोटी आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील खराब कामगिरी झाली. यानंतर आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील त्याच्या अपयशाने आगीत आणखीच भर पडली आहे. विराटच्या या सलग सुरू असलेल्या खराब कामगिरीमुळे त्याच्यावर अधिक तीव्र टीका होत आहे. काही क्रिकेट तज्ज्ञ विराट कोहलीच्या बाजूने बोलत आहेत. तर काही त्याला संघातून वगळण्याचाही सल्ला देत आहेत. या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे विराट कोहलीची एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी.
विश्वचषक २०१९ नंतर कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
२०१९ एकदिवसीय विश्वचषक इंग्लंडमध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून विराट कोहलीने भारतीय फलंदाज म्हणून भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विश्वचषक २०१९ नंतर भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. २०१९ एकदिवसीय विश्वचषकापासून कोहलीने १०४१ धावा केल्या आहेत. तर केएल राहुल या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
२०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर ८४४ धावांसह शिखर धवन भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे श्रेयस अय्यरने ७३७ धावा केल्या असून तो चौथ्या स्थानावर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एकदिवसीय विश्वचषक २०१९ मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी ७०१ धावा केल्या आहेत. रोहित या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
Rohit Sharma has no any great record for consecutive innings only in world cup 2019 matches.
But Virat Kohli plays many innings with 50+ runs in consecutive innings. Virat has better record in T20 and ODI then Rohit Sharma after 2019.#ENGvsIND#ViratKohli????— Amit patel (@Df_amit) July 15, 2022
विश्वचषक २०१९ नंतर वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
१०४१ धावा – विराट कोहली (२४ सामने)
९३० धावा – केएल राहुल (१९)
८४४ धावा – शिखर धवन (१९)
७३७ धावा – श्रेयस अय्याराह (१९)
७०१ धावा – रोहित शर्मा (१६)
२०२० नंतर भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे टॉप ४ फलंदाज-
२२६५ – विराट कोहली (७२ डाव)
२१५७ – रोहित शर्मा (५९ डाव)
२०१७ – ऋषभ पंत (६५ डाव)
१९७९ – केएल राहुल (५१ डाव)
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | “राज्यात कोणीही कोणत्याही पक्षात फिरत आहे, त्यामुळे…”; सुप्रिया सुळेंचा दीपक केसरकरांना टोला
- Ajit Pawar : पूर्ण बहुमत असताना राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणं बरोबर नाही; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- Kapil Dev on Virat Kohli : कपिल देव यांच पुन्हा एकदा विराटबद्दल मोठं वक्तव्य; यावेळी ते काय म्हणाले? वाचा!
- Ajit Pawar | “आताच यांची माईक ओढाओढी चालू आहे…”; अजित पवारांची खोचक टीका
- CM Eknath Shinde : “औरंगाबादच्या नावाला स्थगिती नाही, उद्या कॅबिनेटमध्ये अधिकृत निर्णय घेऊ”; मुख्यमंत्र्यांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
