Share

Bala Nandgaonkar : राज ठाकरे-फडणवीस भेटीवर बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Bala Nandgaonkar । मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (मनसे) यांची भेट घेतली. मुंबईतील दादर येथील राज ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी लोकांच्या नजरा या बैठकीकडे लागलेल्या आहेत. मात्र यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांसमोर येत या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले कि, फडणवीस हे राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. मी स्वतः संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि राज ठाकरे यांनी साधारण 15 ते 20 मिनिटे फडणवीसांसोबत चर्चा केली. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. मात्र, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये साधारण एक ते सव्वा तास चर्चा झाली. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज ठाकरे-फडणवीस भेटीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे यांना ठाकरे-फडणवीस भेटीबाबत विचारले असता त्या म्हणाल्या कि, दरारा, प्रतिष्ठा या गोष्टी कर्तृत्व आणि कामातून होतात. कोणी कोणाच्या घरी गेलं याच्यातून होत नाहीत. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी १०५ आमदार असणारा नेता जातो. याचं काय करणार तुम्ही? कोण कसा विचार करतं हे मला माहिती नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात जे काही सुरु आहे ते सर्वसामान्यांच्या हितासाठी नाही, फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी सुरु आहे. अशी टीकाही त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!