🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : अभिनेत्री मौनी रॉय हिने तिच्या भूमिकांमधून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी छाप पाडली आहे. अभिनयासोबतच मौनी सोशल मीडियावर तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. अनेकदा मौनी तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. ज्या फोटोंवर तिचे चाहते भरभरून लाईक्स आणि कॉमेंट्स करतात. दरम्यान, आता मौनीच्या काही लेटेस्ट फोटोंमुळे तिच्या चाहत्यांची झोप उडाली आहे. कारण या फोटोत ती टॉपलेस दिसत आहे.
मौनी रॉयने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये मौनी हॉटनेसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे. हे फोटो तिने परदेशात सुट्टी एन्जॉय करत असताना काढलेले आहेत. या फोटोंमध्ये मौनी समुद्रकिनारी बसलेली दिसत आहे. ती टॉपलेस असून तिने पांढऱ्या रंगाची चादर ओढली आहे. या फोटोत ती समुद्राच्या निळ्याशार पाण्याकडे बघताना दिसत आहे. यादरम्यान तिने केस मोकळे सोडले असून हातात एक फुल देखील घेतलेले आहे. या फोटोमध्ये मौनीची फक्त पाठ दिसत आहे. कारण हा फोटो बॅक अँगलने काढण्यात आला आहे. हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच या फोटोवर कमेंट करून चाहते मौनीच्या हॉटनेसचे कौतुक करत आहेत.
https://www.instagram.com/p/CgBNslCKk8O/?utm_source=ig_web_copy_link
मौनीचे करियर
टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या करिअरची सुरुवात टीव्ही शो ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’मधून केली होती. या शोमध्ये मौनीने एका सर्वसामान्य दिसणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यांनतर तिने ‘देवो के देव महादेव’ या मालिकेत सतीची भूमिका केली होती. मात्र तिला प्रसिद्धी मिळाली ते ‘नागीण’ या मालिकेतून. त्यानंतर तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Deepak Kesarkar : “आपण राणेंचा कधीच प्रचार करु शकत नाही”; केसरकारांचा पुन्हा राणेंवर हल्लाबोल
- Balasaheb Thorat | “वीजदर २० टक्यांनी वाढवणे ही जनतेची फसवणूक”; बाळासाहेब थोरात यांचा आरोप
- Raj Thackeray Meeting : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक! राजकीय चर्चांना उधाण
- Deepak Kesarkar : “माझ्या जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा”; केसरकरांनी व्यक्त केली दिलगिरी
- Atul Londhe | पेट्रोल व डिझेलचे दर कपात करण्याच्या निर्णयानंतर अतूल लोंढे यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
