Share

IND vs ENG : रोहित शर्मा मैदानावर स्वतःच बनला डॉक्टर; पाहा ‘हा’ VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा गुरुवारी लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात स्वतःच डॉक्टर बनल्याचे पाहायला मिळाले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहितच्या खांद्याला छोटी दुखापत झाली होती. यानंतर रोहित स्वत: फिजिओ बनल्याचे दिसले. त्याने स्वत: च्याच हाताने खांद्यावर दाबून हात नीट केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत. या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता.

रवींद्र जडेजा सामन्याच्या पहिल्या डावातील २८ वे षटक टाकत होता. इंग्लंडचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टन खेळपट्टीवर खेळत होता. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लिव्हिंगस्टनने शॉट खेळला आणि चेंडू थेट कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या भारतीय कर्णधार रोहित शर्माकडे गेला. त्याने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात रोहितच्या डाव्या खांद्याला छोटी दुखापत झाली होती. या दुखापतीचा रोहितला त्रास होत असल्याचेही जाणवले. फिजिओ मैदानावर पोहोचेपर्यंत, त्याआधीच रोहितने उजव्या हाताने डावीकडे मनगटाजवळ पकडले आणि एक झटका देऊन डावा खांदा नीट केल्याचे दिसले होते. यानंतर जडेजाने वैद्यकीय टीमला मैदानावर येण्याचे संकेत दिले, मात्र रोहित ने त्यांना येण्यास नकार दिला. यानंतर खेळ पुन्हा सुरळीतपणे सुरू झाला होता.

https://twitter.com/Ashu__Upadhyay/status/1547586970880475136?t=Hgj6UkkFUTVUmILu9JC0zg&s=19

रोहितला दुसऱ्या वनडेत खातेही उघडता आले नाही

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मावर दुसऱ्या सामन्यात मोठी जबाबदारी होती. कारण या सामन्यात खेळपट्टी गोलंदाजांना भरपूर साथ देत होती. त्यामुळे यावर फलंदाजी करणे अतिशय आव्हानात्मक होते. मात्र रोहितला दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत अपयश आले. तो या सामन्यात १० चेंडू खेळून ० धावांवरच तंबूत परतला. दुसऱ्या एका दिवशी सामन्यात इंग्लंडने भारतावर 100 धावा राखून विजय मिळवला. रोहितने पहिल्या सामन्यात भारतासाठी अत्यंत मोलाची खेळी खेळली होती. त्याने या सामन्यात ७६ धावांसह दमदार अर्धशतक झळकावले होते. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १० गडी राखून विजय मिळवला होता. एकदिवसीय मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ ने बरोबरीत आहेत. मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना दोन्ही संघांसाठी अतिशय निर्णायक ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!