🕒 1 min read
Supriya Sule । मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (मनसे) यांची भेट घेतली. मुंबईतील दादर येथील राज ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी लोकांच्या नजरा या बैठकीकडे लागलेल्या आहेत. यानंतर आता भेटीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळे यांना ठाकरे-फडणवीस भेटीबाबत विचारले असता त्या म्हणाल्या कि, दरारा, प्रतिष्ठा या गोष्टी कर्तृत्व आणि कामातून होतात. कोणी कोणाच्या घरी गेलं याच्यातून होत नाहीत. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी १०५ आमदार असणारा नेता जातो. याचं काय करणार तुम्ही? कोण कसा विचार करतं हे मला माहिती नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात जे काही सुरु आहे ते सर्वसामान्यांच्या हितासाठी नाही, फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी सुरु आहे. अशी टीकाही त्यांनी केली आहे.
दरम्यान, या बैठकीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीत शिंदे-फडणवीस गट उद्धव ठाकरे गटाच्या हातून बीएमसीची सत्ता हिसकावून घेण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या राजकारणात राज ठाकरेंचा पक्ष मनसे आणि भाजप-शिंदे गट यांच्यात युती झाली किंवा पडद्याआड एकमेकांना मदत करण्याचा करार झाला तर भाजप शिवसेनेला उखडून काढू शकेल.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs ENG : रोहित शर्मा मैदानावर स्वतःच बनला डॉक्टर; पाहा ‘हा’ VIDEO!
- Mouni Roy | मौनी रॉयचा टॉपलेस फोटो पाहून चाहते झाले घायाळ
- Virat kohli : “विराटला बळीचा बकरा…” ; पाकिस्तानच्या ‘या’ माजी खेळाडूचं कोहलीबाबत मोठं वक्तव्य
- Deepak Kesarkar : “आपण राणेंचा कधीच प्रचार करु शकत नाही”; केसरकारांचा पुन्हा राणेंवर हल्लाबोल
- Balasaheb Thorat | “वीजदर २० टक्यांनी वाढवणे ही जनतेची फसवणूक”; बाळासाहेब थोरात यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
