Share

Deepak Kesarkar : “माझ्या जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा”; केसरकरांनी व्यक्त केली दिलगिरी

Published On: 

🕒 1 min read

Deepak Kesarkar । मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे व भाजप यांचे सरकार स्थापन झाले. आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा गाडा हाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र या सर्व घडामोडी घडताना शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अनेक मोठी वक्तव्ये आणि गौप्यस्फोट केले आहेत. लवकरच उद्धव ठाकरे आम्हाला समजून घेतील आणि आशा आहे की ते आम्हाला आशीर्वाद देतील, असं विधान करत त्यांनी शिंदे-ठाकरेंचे संबंध जुळवण्याचा प्रयत्न देखील केला.

तसेच राष्ट्रवादी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान राखत नाहीत. सत्तेसाठी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेली आहे. बंडाच्या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळेच ही वेळ आल्याचे दीपक केसरकर यांनी वारंवार सांगितले होते. मात्र यानंतर आता आपल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी शरद पवार यांची जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. शिवाय ते एक ज्येष्ठ नेते असून माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचेही केसरकर म्हणाले आहेत.

दरम्यान, यापूर्वीही बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधत हे पाऊल उचलल्याचे सांगितले. तसेच आम्ही आता सत्तेमध्ये भाजपसोबोत आलोत. एक कुटुंब तयार झालं. आम्ही आता एकटे नसून आमच्या कुटुंबात आता भाजप आहे. नवीन कुटुंब तयार झालं आहे. आम्हाला मातोश्रीवर बोलताना त्यांना भाजपला देखील बोलवावं लागेल, अशी अट देखील याआधी केसरकर यांनी मातोश्रीवर जाण्यासंदर्भात ठेवली होती.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!