Share

Amol Mitkari : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा थेट जनतेतूनच निवडावा; अमोल मिटकरी यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठ्या घोषणा केल्या आहेत. सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिंदे सरकारची सर्वांत पहिली मोठी घोषणा म्हणजे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. सरकारने पेट्रोलवरील कर कमी करत सर्व सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांनतर दुसरी मोठी घोषणा म्हणजे आता नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार आहे. यानंतर यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल मिटकरी म्हणले कि, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन एक घोषणा केली आहे. सरपंच आणी नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार आहे. थेट लोकांमधून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडावा असे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जर वाटत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील जनतेतून निवडला गेला पाहिजे, असं म्हणत मिटकरी यांनी शिंदे-फडणवीसांवर जोरदार केले आहे.

दरम्यान, देशात मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. मात्र आता आपण पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात करण्यात आल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र यामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!