Share

Ashok Chavan | पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत करा – अशोक चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

नांदेड: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. अनेक नद्या, नाले यांना पूर आलेले आहेत. तसेच बऱ्याच भागातील धरणे भरल्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा फटका बसत आहे. अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने मदत द्या अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे.

 

“पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. नांदेड जिल्हात काही जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच २ व्यक्तींचे मृत्यू देखील झाले आहेत. आता पंचनामे करण्यावर मर्यादा आहेत, याची जाणीव आहे. परंतु पाऊस ओसरल्यावर तातडीने पंचनामे झाले पाहिजेत आणि मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना नियमाप्रमाणे मदत दिली गेली पाहिजे”, असे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!