🕒 1 min read
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आहेत. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले. ग्राऊंडवर जाऊन पाहणी करत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांची स्तुती होत आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होत आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी माजी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
कर्तव्यदक्षता कुठे जागी असेल तर ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या ठायी तुम्हाला अनुभवायला मिळेल. आधीचे मुख्यमंत्री असते तर कदाचित आज आपल्याला लाईव्ह दिसले असते आणि म्हणाले असते ‘माझं इथून लक्ष आहेच’, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
कर्तव्यदक्षता कुठे जागी असेल तर ती मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (@mieknathshinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (@Dev_Fadnavis) ह्यांच्या ठायी तुम्हाला अनुभवायला मिळेल.????????
आधीचे मुख्यमंत्री असते तर कदाचित आज आपल्याला लाईव्ह दिसले असते आणि म्हणाले असते
"माझं इथून लक्ष आहेच"????
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 11, 2022
सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ सगळीकडे जोरदार पाऊस सुरु आहे. त्यातच राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आलं आहे. तसेच नवनिर्वाचत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. विदर्भात गडचिरोली मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळेच पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गडचिरोलीमध्ये तीन दिवसांचा रेड अलर्ट जारी केला आहे. पूर परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी गडचिरोलीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिला विदर्भ दौरा आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. आता ते मुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीचा दौरा करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
