मुंबई : श्रीलंकेने गॉल कसोटीत पाहुण्या ऑस्ट्रेलिया (SL vs AUS) संघाचा एक डाव आणि ३९ धावांनी पराभव केला. स्टार खेळाडूंनी जडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा चौथ्या दिवशीच श्रीलंकेच्या नव्या खेळाडूंनी पराभव केला. दुसऱ्या कसोटीचा हिरो ठरलेल्या प्रभात जयसूर्याने पदार्पणाच्या कसोटीतच १२ बळी घेतले. या ३० वर्षीय डावखुऱ्या फिरकीपटूसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज दोन्ही डावात असहाय्य दिसत होते. गॉल कसोटीत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांच्या शतकांमुळे ३६४ धावा केल्या. त्याचवेळी, दिनेश चंडिमलच्या द्विशतकाच्या जोरावर श्रीलंकेला पहिल्या डावात ५५४ धावा करता आल्या. फिरकी गोलंदाजांच्या जोरावर श्रीलंकेने कांगारू संघाला दुसऱ्या डावात अवघ्या १५१ धावांत गुंडाळले.
या कसोटीच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेने पहिल्या डावात ६ बाद ४३१ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. मेंडिसने चंडीमलसोबत सातव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. तो २९ धावा करून मिचेल स्टार्कचा बळी ठरला. यानंतर महिष तिक्षनानेही १० धावा केल्या. कमिन्सला त्याची विकेट मिळाली. श्रीलंकाने ५०५ धावांवर ९ विकेट गमावल्या होत्या. चंडिमलने शेवटच्या विकेटसाठी कसून राजितासोबत ४९ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत चंडीमलने सर्व धावा करत द्विशतक ठोकले.
12 wickets for Prabath Jayasuriya as ???????? won by an innings and 39 runs in the final Test in Galle ???? #SLvAUS Test series finishes 1-1 ???? pic.twitter.com/55P9S96WqZ
— Sri Lanka Cricket ???????? (@OfficialSLC) July 11, 2022
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (२४) आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. रमेश मेंडिसने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याच्या चेंडूवर वॉर्नर एलबीडब्ल्यू आऊट झाला. यानंतर विकेट पडण्यास सुरुवात झाली. प्रभात जयसूर्याने एकाच षटकात ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथला बाद करत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. पहिल्या डावात नाबाद १४५ धावांची खेळी करणाऱ्या स्मिथला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक ३२ धावा केल्या. दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने ६ तर महेश तिक्षना आणि रमेश मेंडिसने प्रत्येकी २ बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

