🕒 1 min read
मुंबई : शिवसेना दाखल केलेल्या याचिकेवर आज ११ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली होती. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या आमदार निलंबनाच्या अधिकारांवर बंदी घातली आहे. काल एक एफिडेविड फाईल करण्यात आले आहेत. त्यातून विधानसभा अध्यक्षांना निलंबनाचे अधिकार आहे. असा दावा करण्यात आला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
शिवसेनेच्या याचिका सुप्रीम कोर्टानं आज सुनावणीला घेतल्या नाहीत. तसेच सुनावणीसाठी पुढील तारीखही स्पष्ट न केल्यानं शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता शिवसेनेने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतले आहे. ठाकरे गटाकडून आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गळ घालण्यात आली आहे की आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय घेऊ नका.
सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिण्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सध्या शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आहे, त्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय निवडणूक आयोगाने घेऊ नये, कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात आलीय.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
