अहमदनगर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर ४० आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दिला होता. यानंतरही अनेक कार्यकर्ते तसेच शिवसेनेतील खासदार शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. शिंदे घाटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी या अगोदरही पक्षातील १२ खासदार संपर्कात असल्याचे सांगितले होते. यानंतर आता आमदार शंकरराव गडाख यांनी शिंदे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.
गडाख यांनी आपला निर्णय हा कोर्टाच्या निर्णयानंतरच देणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले शंकरराव गडाख हे उद्या कोर्टाचा निकाल लागल्यानंतर काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भूमिकेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण आपण उद्धव ठाकरे यांच्याशीच एकनिष्ठ असल्याचे ते म्हणाले आहेत. यावेळी अहमदनगर येथील नेवासा येथे पार पडलेल्या शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.
तसेच पुढे पक्षामुळेच आपल्याला पद आणि सर्वकाही मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, सध्याच्या वातावरणात कोणताही निर्णय घेणार नाही. जे काही ठरेल ते कोर्टाच्या निर्णायानंतर असे म्हणून त्यांनी दोन्ही शक्यता वर्तवल्या आहेत. तसेच आपल्यालाही गुवाहटीवरुन फोन आल्याचे सांगितले. एवढेच नाहीतर सर्व आमदार येणार आहेत तुम्हीही या असेही सांगण्यात आल्याचे ते म्हणाले. तर शिवसेनेतीलच काही आमदार हे सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचे सांगत होते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

