🕒 1 min read
सांगली : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह मोठा बंड केला. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र या सरकारच्या भवितव्यावर प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. दरम्यान, हे सरकार अडीच वर्षं नाही तर पुढील दहा वर्षे चालणार, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
“यापूर्वी महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, असं आम्ही म्हणत होतो. आता विरोधक हे आमचं सरकार चालणार नाही असं म्हणत आहेत. मात्र आमचं सरकार फक्त अडीच वर्षं नाही तर पुढील दहा वर्षे टिकणार आहे, असा दावा केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी आठवले बोलत होते.
जोपर्यंत नरेंद्र मोदी खंबीरपणे आहेत. तोपर्यंत आम्हाला कोणतीही चिंता नाही. राज्य सरकारच्या भवितव्यावर कविता सादर केली. “शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी, अडीच वर्ष चालणार आहे सत्तेची गाडी”, अशी कविता आठवले यांनी सादर केली. साहित्यिक आणि कादंबरीकार डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी 40 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी माहिती देखील रामदास आठवले यांनी दिली.
नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होती. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, मनसेचा सत्ता स्थापनेत काही संबंध नाही. त्यामुळे मनसेला मंत्री पद देण्याचा प्रश्न येत नाही, तसा विचार जर होत असेल नक्कीच याचा आम्ही विरोध करणार.
तसेच मंत्रीमंडळात एखादे मंत्री पद आम्हाला मिळणार असल्याचा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर दोन तृतियांश पेक्षा जास्त आमदार ज्यांच्या बाजूने आहेत. तिच खरी शिवसेना असल्याचे आठवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
