मुंबई : शिवसेना-शिंदे यांचा वाद आता न्यायालयात पोहचले आहे. दोन्ही बाजूंकडून न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. शिवसेनेने केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या अपात्रतेची कारवाईला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल्या असून यावरच आज ११ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली होती.
यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या आमदार निलंबनाच्या अधिकारांवर बंदी घातली आहे, काल एक एफिडेविड फाईल करण्यात आले आहेत, त्यातून विधानसभा अध्यक्षांना निलंबनाचे अधिकार आहे, असा दावा करण्यात आला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने यावर स्टे दिलायनं आता कोर्ट संपूर्ण प्रकरण ऐकून घेईन आणि त्यानंतर पुढील निर्णय घटनापीठ ऐकून घेऊन निर्णय देईल.
दरम्यान, मात्र सर्वोच्च न्यायालयातील सोमवारच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नसल्याने ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. मात्र यामध्ये बराचसा वेळ जाऊ शकतो. सुनावणी पुर्ण होईपर्यंत आमदारांचं निलंबन नाही. खंडपीठ नेमण्यासाठी वेळ लागणार आहे. यानंतर १६ आमदारांच्या याचिकेसाठी कोर्ट खंडपीठ नेमणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

