🕒 1 min read
मुंबई: काल आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी आपले अनुभव सांगत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशी महापूजेला चारवेळा गेलो आहे. राज्यातील सर्वसामान्य माणूस हा उन्हातान्हाचा, दगडाधोंड्याचा विचार न करता पंढरपूरला दर्शनासाठी जातो. त्याची नाळ त्यामध्ये आहे. त्यात कोणतीही चुकीची भूमिका नसते.”, असे शरद पवारांनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले कि, “पंढरीच्या पोटी त्याचे असलेले प्रेम त्याचा आदर राखला पाहिजे. त्यामुळे मी विचाराने वेगळा असलो तरी या वारकऱ्यांचा सन्मान ठेवायचा, त्यांच्या भावनेचा आदर करायचा, त्यासाठी मी पूजेला गेलो आहे. मात्र त्याचे राजकारण केले नाही किंवा प्रसिद्धीही केली नाही.”, असा टोला त्यांनी शिंदे यांना लगावला.
यावेळी शरद पवारांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला. राज्यात आतापर्यंत जे सरकार होते त्याचे केंद्र सरकारसोबत अत्यंत प्रेमाचे संबंध होते. ते प्रेम अधिक फुलविण्यासाठी कोश्यारींसारखी व्यक्ती इथे ठेवण्यात आली होती. आता तो कालखंड संपला आता नवे राज्य आले. शिंदेशाहीमध्ये राज्यपालांच्या बाबत केंद्र सरकार काय निकाल घेत हे पाहूया. आता राज्यपाल प्रलंबित १२ आमदारांच्या जागेवर निश्चित निर्णय घेतील. राज्यकर्ता संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असतो. तो कोणत्या एका पक्षाचा किंवा संघटनेचा नसतो. असेही पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Uddhav Thackeray : “आईच्या दुधाशी बेईमानी करू नका…”, उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत आमदारांना भावूक पत्र
- Alia-Ranbir : बाळ झाल्यानंतर आलिया भट्ट फिल्म इंडस्ट्री सोडणार का? यावर रणबीरने दिलं उत्तर, म्हणाला…
- Bharat Gogavale : “…तेव्हा लाज वाटली नव्हती का?”, शिंदे गटातील आमदाराचा आदित्य ठाकरेंना सवाल
- Shalini Thackeray : “अगोदर डुक्कर, गद्दार विशेषणे लावायची मग…”, शालिनी ठाकरेंचा ‘शिवसेने’वर निशाणा
- Shinde VS Thackeray : आजची सुनावणी लांबणीवर?; शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
