Share

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील सत्तांतर वादात सर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ दोन निर्णयांकडे असणार लक्ष

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षाचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. शिवसेनेशी बंड करत सत्तास्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटावर शिवसेनेने अपात्रतेची कारवाई केली होती, याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केल्या असून यावरच आज ११ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली होती. सध्या शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी सुरु असून पुढील सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कोणतीही कारवाई होऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सदरील प्रकरण घटनापीठाकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘या’ दोन मुद्द्यांवर न्यायालय काय निर्णय देणार?

गटनेता आणि प्रतोद नेमण्याचे अधिकार बहुसंख्य आमदार असलेल्या गटाला आहेत कि, मूळ पक्षाला आहेत हा सर्वांत महत्वाचा मुद्दा असून दुसरा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बरोबरचे आमदार आहेत तोच विधिमंडळ पक्ष आहे कि दोन तृतीयअंश आमदार बाहेर पडल्यामुळे तो वेगळा गट निर्माण झाला आहे. यासंदर्भात न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान  मंत्रीमंडळ विस्तारावर न्यायालयाने कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले असल्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. मात्र या दोन मुद्द्यांवर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!