Share

Gopichand Padalkar : “महाराष्ट्रात शेतीला सन्मान, कष्टाला मान…”, गोपीचंद पडळकरांचे विठूरायाला साकडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज (१० जुलै) आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून राजकीय मंडळीकडून नागरिकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विठुरायाकडे राज्याच्या शेतकऱ्यांसाठी साकडे घातले आहे. “कष्टकरी शेतकरी बहुजनांचं दैवत श्री विठ्ठलाचा जयघोष सुरू आहे. आषाढी एकादशी निमित्त सान-थोर मंडळी उत्साहात विठूरायाच्या भक्तीत लीन आहेत. श्री विठूरायाकडे एकच मागणं, या महाराष्ट्रात शेतीला सन्मान, कष्टाला मान, प्राणी-पक्ष्यांचं गान राहू दे. जय हरी विठ्ठल.विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलं”, असे ट्वीट पडळकर यांनी केले आहे.

तर आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ही पहिलीच महापूजा होती. मुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांसाठी विठ्ठलाला साकडे घातले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, “माझ्यासाठी आजचा दिवस आनंदाचा असून आज मी १२ कोटी जनतेच्या वतीने विठ्ठलाची पूजा केली. शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा सर्व घटकांना सुख समृध्दी लाभू दे, असे साकडे विठूरायाला मी घातले आहेत. तसेच देशभरातील विविध मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सोयी सुविधा असतात.  त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार असून त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. लवकरात लवकर डीपीआर तयार झाल्यास शासन त्यांना मंजुरी देईन. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!