🕒 1 min read
मुंबई: आज (१० जुलै) आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून राजकीय मंडळीकडून नागरिकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र आजच्या एकादशी पर्वाला भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खास मराठीतून शुभेच्छा देणारे ट्वीट केले आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा करत अमित शाह (Amit Shah) आणि जे.पी. नद्दा यांची भेट घेतली आहे.
“आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी मी विठुरायाला वंदन करतो. आज दोन वर्षांनी भारतातील लाखो वारकरी बांधव आपल्या लाडक्या विठूमाऊलीचे दर्शन घेत आहेत. यापुढे कधीही असा खंड पडू नये आणि सर्वांचे मंगल व्हावे यासाठी विठुरायाकडे प्रार्थना! आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”, असे ट्वीट अमित शाह यांनी केले आहे.
आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी मी विठुरायाला वंदन करतो. आज दोन वर्षांनी भारतातील लाखो वारकरी बांधव आपल्या लाडक्या विठूमाऊलीचे दर्शन घेत आहेत. यापुढे कधीही असा खंड पडू नये आणि सर्वांचे मंगल व्हावे यासाठी विठुरायाकडे प्रार्थना !
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! pic.twitter.com/EN4AwPL2or
— Amit Shah (@AmitShah) July 10, 2022
महाराष्ट्रातील सरकार घडवण्यामागे मोदी-शाह यांचे सहकार्य-
दरम्यान काल दिल्लीत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते कि,” लोकांच्या मनात असलेलं सरकार आम्ही स्थापन केले आहे. सरकार स्थापन करण्यात पंतप्रधान मोदी, अमित शाह तसेच देवेंद्र फडणवीस यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेतली.” असे शिंदे यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा-
अनेक राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर स्थानापन्न झाले आहेत. यंदाचा महापूजेचा मान कुणाला मिळणार, यावर अनेक चर्चा रंगत होत्या. अखेर तो मान नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच प्राप्त झाला. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ही पहिलीच महापूजा होती. असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली.
महत्वाच्या बातम्या:
- Obc reservation : आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका मागे घ्या – धनंजय मुंडे
- Payal Rohatgi : अभिनेत्री पायल रोहतगी अडकली लग्नबंधनात : पाहा PHOTO
- Sri Lanka crisis : श्रीलंकेत भयंकर अराजकता; आंदोलकांनी लावली पंतप्रधानांच्या घराला आग
- Shivsena : शिवसेना आणि शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या; विधीमंडळ सचिवांनी दोन्ही बाजूंकडील आमदारांना बजावल्या नोटीसा
- Sanjay Raut : बाळासाहेबांचा फोटो पोस्ट करत संजय राऊतांनी म्हटले, “विठ्ठल…विठ्ठल”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
