Share

Shahaji Bapu : “काय झाडी, काय हाटील..”, फेम शहाजी बापू यांचा कार्यकर्त्याने घेतला थेट ‘मुका’; PHOTO व्हायरल 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडाची चर्चा तर अजूनही राज्यात चालू आहे. मात्र यात अजून एक चर्चा म्हणजे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची कार्यकर्त्याशी बोलताना फोनवरून सहज मारलेल्या डायलॉगची अधिकच चर्चा सध्या रंगत आहे. ” काय डोंगूर, काय झाडी काय हॉटेल…सगळं काही ओके मध्ये हाय..”, हा त्यांचा डायलॉग इतका फेमस झाला कि त्यावर अनेक मिम्स आणि गाणीही बनली. हा विषय चर्चिला जाण्याचे कारण म्हणजे शहाजी बापू (Shahaji Bapu) पाटील यांची इतकी क्रेझ निर्माण झालीये कि, त्यांच्या कार्यकर्त्याने त्यांना बघून थेट त्यांचा मुका घेतला आहे. याचाच फोटो सध्या जाम व्हायरल होत आहे.

शहाजी बापू पाटील यांची क्रेझ प्रचंड भावलेल्या या कार्यकर्त्याचे नाव राजू ओसवाल असे आहे. तो पुण्यातला एक उद्योजक असल्याची माहिती समोर आली. मुंबईमध्ये या कार्यकर्त्याने भेटून थेट शहाजी बापू पाटील यांचा मुका घेतला आहे.

हा फोटो सध्या समाज माध्यमवर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोला अनेक कॅप्शन देऊन व्हायरल करत आहे. त्यामुळे आपल्या अनोख्या अंदाजाने चर्चेत असलेले शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा सोशल मिडीयावर ट्रेंडींगचा विषय ठरले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!