🕒 1 min read
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनाला मोठा आणि जबर धक्का बसला आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढणार आहेत. यावरूनच भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टोला लगावला आहे.
“स्वतःच सरकार असताना DINO वर निष्ठा दाखवण्या पेक्षा तीच निष्ठा शिवसैनिकांवर दाखवली असती तर “निष्ठा” यात्रा काढण्याची वेळ आली नसती!”, असे ट्वीट करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
स्वतःच सरकार असताना.. DINO वर निष्ठा दाखवण्या पेक्षा..
तीच निष्ठा शिवसैनिकांवर दाखवली असती..
तर “निष्ठा” यात्रा काढण्याची वेळ आली नसती!!— Nitesh Rane (@NiteshNRane) July 8, 2022
दरम्यान आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला 8 जुलैपासून अर्थातच आजपासून सुरुवात होणार आहे. यात आदित्य ठाकरे गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून शक्तिप्रदर्शन करतील. याद्वारे शिवसेना पुनर्बांधनीस सुरुवात केली जाणार आहे. मात्र शिवसेनेला त्यापूर्वीच अजून एक मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ठाणे महापालिकेवरील नियंत्रण पूर्णपणे संपले असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Rupali Thombre : “बाळासाहेब ठाकरे यांचाच धनुष्यबाण…”, रुपाली ठोंबरेंची शिंदे गटावर टीका
- Uddhav Thackeray : “शिवसैनिकांनो धनुष्यबाण हिसकावण्याचा प्रयत्न होणार, नव्या…”, उद्धव ठाकरेंचे आवाहन
- Pravin Tarde : ‘या’ दोन्ही चित्रपटांसाठी प्रवीण तरडे यांचा शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मान
- Atul Bhatkhalkar : “शिवसेनाप्रमुखांच्या काळात प्रचंड दबदबा…”, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- Sanjay Raut : “…यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे? संजय राऊतांचा बंडखोर आमदारांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
