Share

Sanjay Raut : “…यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे? संजय राऊतांचा बंडखोर आमदारांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ‘मातोश्री’ ची परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सर्वांचाच सन्मान होतो. दरवाजे उघडेच असतात व दाराबाहेरील चपलांचे ढिगारे हेच ‘मातोश्री’ चे वैभव आणि श्रीमंती आहे. हे जे काही कथित बंड वगैरे झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे एका तळमळीने आवाहन करीत आहेत की, “शिवसेना हे कुटुंब आहे. मातोश्री तुमचे हक्काचे घर आहे. परत फिरा. घरी या!” यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून करत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

भाजपला शिवसेनेचा पराभव करायचा नसून शिवसेना संपवायची आहे व पाहुण्याच्या चपलेने विंचू मारायचा आहे. पण विंचवाचा डंख व विष जहाल असते. इंगळी डसली की काय होते ते डोंगर झुडुपातले राजकारण करणाऱ्यांना समजते. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने उघडेच असतात व बाहेर चपलांचे ढिगारे वाढतच आहेत. या वैभवाशी कसा सामना करणार? असा खोचक सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.

शिवसेनेत जे काही कथित बंड झाले त्याची पेरणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतानाच झाली होती, असा गौप्यस्फोट त्यांच्यातल्याच एकाने केला. भारतीय जनता पक्ष सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सरकार पाडायचेच या इर्षाने कसा कामास लागला होता तेच या आमदारांच्या वक्तव्याने स्पष्ट होते. “आम्ही तडफडायचो, ज्यांच्या विरोधात लढलो तीच माणसे आपल्यासोबत सत्तेत. आपली कामे कशी होणार?” असा प्रश्न या आमदाराने विचारला. 2014 साली भाजप शिवसेना वेगळे लढले. ज्या भाजपविरोधात शिवसेना लढली त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे सत्तेत बसले. तेव्हा हा क्रांतिकारी प्रश्न कुणाला का पडू नये की, “ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या बरोबर सत्तेत कसे बसायचे?”

हिंदुत्वाचा मुद्दाही तेव्हा उपस्थित केला गेला नाही. भाजपने तेव्हा हिंदुत्व अजिबात पाळले नाही. तरीही ‘सुरत ‘फेम अनेक मंत्री नंतर त्या मंत्रिमंडळात सामील झाले. यापैकी आणखी एका सन्माननीय बंडखोर आमदाराने स्पष्ट केले, “मातोश्रीचे दरवाजे सन्मानाने उघडले तर आम्ही आनंदाने परत येऊ!” आता दरवाजे सन्मानाने उघडायचे म्हणजे नक्की कसे काय करायचे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!