Share

Uddhav Thackeray : “शिवसैनिकांनो धनुष्यबाण हिसकावण्याचा प्रयत्न होणार, नव्या…”, उद्धव ठाकरेंचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांसोबत मिळून सरकार स्थापन केले आहे. लवकरच शिंदे गट शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावर देखील दावा करणार आहे. यासंदर्भातच “कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे नवे चिन्ह मिळेल ते कमी वेळेत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा”, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले आहे.

दरम्यान शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी  केली असून याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. मात्र अपात्र आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार सत्तेवर आले आहे.

त्यातच शिवसेना आमदारांसोबत शिवसेना खासदारांचाही पाठींबा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यातच गुरुवारी ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ठाणे महापालिकेवरील नियंत्रण पूर्णपणे संपले असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!