🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांसोबत मिळून सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील काढून घेण्याचा प्रयत्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भातच कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे नवे चिन्ह मिळेल ते कमी वेळेत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
“शिवसेनाप्रमुखांच्या काळात प्रचंड दबदबा असलेल्या पक्षाची झालेली वाताहत निश्चितपणे आनंददायी नाही. पण उध्दवजी याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्हीच आहात…”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान शिवसेनेने १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली असून याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर येत्या ११ जुलैला सुनावणी होणार आहे. मात्र अपात्र आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार सत्तेवर आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “…यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे? संजय राऊतांचा बंडखोर आमदारांवर निशाणा
- MNS VS Shiv Sena : शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात; ‘मनसे’नी म्हटले, “जमिनीवर राहून आदर…”
- NCP VS BJP : ‘मोदी है तो मुमकीन है’ इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीचा केंद्रावर निशाणा
- Radhakrishna Vikhe Patil : भरकटलेलं जहाज आणि बेताल प्रवक्ते एवढीच शिवसेना शिल्लक राहिलीय – राधाकृष्ण विखे पाटील
- Satara : मुख्यमंत्र्यांच्या जन्मभूमीत ‘या’ मोठ्या प्रकल्पाची घोषणा; साताऱ्यासाठी घेतला महत्वपुर्ण निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
