Pravin Tarde : ‘या’ दोन्ही चित्रपटांसाठी प्रवीण तरडे यांचा शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मान

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून प्रवीण विठ्ठल तरडे हे नाव सतत चर्चेत आहे. प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले होते. दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर त्यांना शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबाबत त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रवीण तरडे यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “शाहीर दादा कोंडके पुरस्कार २०२२ – सर्वोत्त्कृष्ट दिग्दर्शक. यंदाचा हा मानाचा पुरस्कार सरसेनापती हंबीरराव आणि धर्मवीर , मुक्काम पोष्ट ठाणे या दोन्ही सिनेमांच्या दिग्दर्शनासाठी मिळाला. या दोन्ही सिनेमांसाठी अहोरात्र झटलेल्या प्रत्येकाला हा पुरस्कार समर्पित”.

https://www.instagram.com/p/CftMyzTLc1H/

प्रवीण तरडे यांना सर्वोत्त्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. त्यांच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :