Share

Rupali Thombre : “बाळासाहेब ठाकरे यांचाच धनुष्यबाण…”, रुपाली ठोंबरेंची शिंदे गटावर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांसोबत मिळून सरकार स्थापन केले आहे. लवकरच शिंदे गट शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावर देखील दावा करणार आहे. यासंदर्भातच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी शिंदे गटावर टीका करत आव्हान दिले आहे.

“शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच धनुष्यबाण हे चिन्ह कायदेशीर असून शिवसैनिक म्हणून बापमाणुस दैवत मानणाऱ्या पक्षाचे नाव, चिन्ह छलकपट करून गद्दारी करून घेऊ शकत नाही. दम असेल तर कोणत्याही पक्षात जमा व्हा आणि व्हा की सिद्ध.”, असे ट्वीट रुपाली ठोंबरे यांनी केले आहे.

दरम्यान यासंदर्भातच “कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे नवे चिन्ह मिळेल ते कमी वेळेत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा”, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!