Share

Eknath Shinde : “आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार”, एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून 30 जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. म्हणजेच उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र या बहूमत सिद्ध करण्याच्या विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. कोर्ट आज संध्याकाळी 5 वाजता यावर सुनावणी करेल. तर गुवाहाटीला सर्व आमदार कामख्या देवीचे दर्शन घेऊन गोव्याला निघणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. देवीचे दर्शन घेतल्यानंतर बंडखोर गटाते नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही उद्या मुंबईत पोहोचणार आहोत. आमच्याकडे ५० आमदार आहेत. दोनतृतियांशपेक्षा जास्त बहुमत आमच्या शिवसेना गटाकडे आहे. त्यामुळे उद्या बहुमत चाचणीत आम्ही पास होणार आहोत. आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी देखील आम्ही जाणार आहे. लोकशाहीत संख्या महत्त्वाची असते. या देशात राज्यघटना आणि कायद्याच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही.”

दरम्यान शिंदे गटात 49 आमदार आहेत. त्यामुळे राज्यात असलेलेल सध्याचे महाविकास आघाडी सरकार आल्पमतात आहे. काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान राज्यपालांनी 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावले असून महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!