Share

IND vs NZ : वर्ल्डकपनंतर होणार भारत-न्यूझीलंड मालिका; ‘या’ तारखेला होणार पहिला टी-२० सामना!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : न्यूझीलंड क्रिकेट संघाने २०२२-२३ साठी देशांतर्गत हंगाम जाहीर केला. यादरम्यान न्यूझीलंड देश भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि इंग्लंड या संघांचे यजमानपद भूषवणार आहे. घरच्या हंगामाची सुरुवात बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्धच्या तिरंगी मालिकेने होईल, जी टीम २०२२ च्या टी-२० विश्वचषकासाठी महत्त्वाची असेल.

यादरम्यान, न्यूझीलंड संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे यजमानपद भूषवणार आहे. भारतीय संघ किवीविरुद्ध तीन टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात १८ नोव्हेंबरपासून टी-२० सामन्याने होणार आहे. १३ नोव्हेंबरला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना होणार आहे. गेल्या वर्षी किवी संघाने विश्वचषकानंतर लगेचच टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. ही मालिका १८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.

न्यूझीलंड संघ पाकिस्तान आणि भारताचा दौरा करणार आहे. इंग्लंड मालिकेनंतर किवी संघाला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात २ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंडचा महिला संघ दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी बांगलादेशविरुद्ध ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे.

भारताचा न्यूझीलंड दौरा

  • १८ नोव्हेंबर – पहिला टी-२० सामना, वेलिंग्टन
  • २० नोव्हेंबर – दुसरी टी-२० सामना, माउंट माऊनगानुई
  • २२ नोव्हेंबर – तिसरा टी-२० सामना, नेपियर
  • २५ नोव्हेंबर – पहिली वनडे, ऑकलंड
  • २७ नोव्हेंबर – दुसरी वनडे, हॅमिल्टन
  • ३० नोव्हेंबर – तीसरी वनडे, ख्राइस्टचर्च

महत्त्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!