Share

Dipali Sayyad : “मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्तची मशीन आहे” ; दीपाली सय्यदचा मनसेला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. राज्यातील सत्तानाट्याचा आजचा आठवा दिवस आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना फोन केल्याचं समजतंय. राज ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र राज्यातील सध्याच्या परिस्थितित  हा फोन महत्त्वाचा मानला जात आहे

अशातच शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विटर द्वारे राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “मातोश्रीच्या किंवा राजकारणाला कंटाळून बंडखोरी केली असे कारण सांगणारे माननीय राज साहेब आता अकरा वरून एक वर आले आहेत आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेचे राजकीय गणित नेहमी अधिक असते वजा नाही त्यामुळे राजकीय सल्ला घेताना हिशेब बघून घ्या मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्त ची मशीन आहे” अशा आशयाचं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे.

दीपाली सय्यद यांच्या या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. याआधी देखील “एकनाथ शिंदे भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपाचे तेवढी लायकी आहे का ते तपासावे उगाच भाजपच्या आयटी सेल च्या लिंबूटिंबूनी सोशल मीडियावर तर्कवितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही” असे दीपाली सय्यद यांनी म्हटलं होतं

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या फोनची देखील चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी मनसेच्या नेत्यांशी चर्चाही केली होती. या बैठकीत काय ठरलयं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!