🕒 1 min read
मुंबई : आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील (IRE vs IND) पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज उमरान मलिक भारताकडून पदार्पण करत आहे. मलिक हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा ९८वा खेळाडू ठरला आहे, तर कोनोर ओल्फर्ट आयर्लंडकडून पदार्पण करणार आहे. दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत.
रोहित शर्माला विश्रांती दिल्यानंतर आणि केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व केले. आता हार्दिक पंड्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या दोन्ही सामन्यांमुळे ऑस्ट्रेलियात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी ‘कोअर ग्रुप’ आणि पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांसाठी संघाची तयारी करण्यात मदत होईल.
A dream come true moment!!Congratulations to Umran Malik who is all set to make his T20I debut for #TeamIndia
He gets ???? No.98 #IREvIND pic.twitter.com/8JXXsRJFbW
— BCCI (@BCCI) June 26, 2022
दोन्ही संघांची playing 11
भारत : ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, उमरान मलिक.
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलनी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), जॉर्ज डॉकरेल, मार्क एडेयर, अँडी मॅकब्राईन, क्रेग यंग, जोशुआ लिटल, कोनर ओल्फर्ट.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
