🕒 1 min read
मुंबई : राज्यातील सत्तानाट्याचा आजचा सहावा दिवस आहे. राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले कि, एकनाथ शिंदे गटात गेलेले आमदार नक्कीच परत येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आजही आमची आघाडी असून आघाडी टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा असेल असं ते म्हणाले.
तसेच पुढे शरद पवार म्हणाले कि, बंडखोरांनी आपल्या पाठीमागे राष्ट्रीय पक्ष असल्याचं सांगितलं पण भाजपशिवाय दुसरा पाठिंबा देणारा पक्ष कोणता आहे? असं म्हणत शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे. पण आमची उद्धव ठाकरे यांच्यासोबत कमिंटमेंट आहे, आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. बंडखोरांवर कारवाई करायची का नाही ते उद्धव ठाकरे ठरवतील. येत्या दोन तीन दिवसांत कारवाई होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, जर राज्यात राष्ट्रपती राजवट आली तर भाजपने एवढं केलं त्याचा फायदा काय? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. बंडखोरांनी गुजरात आणि आसाम हे दोन राज्य निवडले आहेत. त्या राज्यात भाजपचे सरकार आहे. तसेच भाजप केंद्रातील सरकारच्या भरवश्यावर राष्ट्रपती राजवट लागू करू पाहत आहे. जर केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली तर याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही पटोले यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
