Share

Sharad Pawar : “जर राज्यात राष्ट्रपती राजवट आली तर भाजपने…” ; शरद पवारांचा खोचक सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झालाय. आज सहावा दिवस आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. शिंदे गटाचं संख्याबळ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. या सर्व पाश्वर्भूमीवर आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले कि, शिंदे गटात गेलेले आमदार नक्कीच परत येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आजही आमची आघाडी असून आघाडी टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा असेल. जर राज्यात राष्ट्रपती राजवट आली तर भाजपने एवढं केलं त्याचा फायदा काय? असा प्रश्न त्यांनी केला आहे. बंडखोरांनी गुजरात आणि आसाम हे दोन राज्य निवडले आहेत त्या राज्यात भाजपचे सरकार आहे. असं पवार आज बोलताना म्हणाले.

दरम्यान, आज नाना पटोलेंनी देखील थेट दिल्लीलाच इशारा दिला आहे. दिल्लीला हे महाग पडणार आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीने राज्यावर नजर टाकली तेव्हा नाश झाला आहे. त्यामुळे याचे गंभीर परिणाम दिल्लीला भोगावे लागतील. त्यामुळे तमाशा थांबवा. भाजप केंद्रातील सरकारच्या भरवश्यावर राष्ट्रपती राजवट लागू करू पाहत आहे. जर केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली तर याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही पटोले यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!