Share

Keshav Upadhye : “तुम्हाला आमदारांपेक्षा राष्ट्रवादी व पवारसाहेब प्रिय” ; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाचा आज सहावा दिवस आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. शिंदे गटाचं संख्याबळ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. या सर्व पाश्वर्भूमीवर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आम्ही माफ करणार नसल्याचे म्हंटले होते. यावर आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पलटवार केला आहे.

“सध्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दोघेही बंडखोरांना माफ करणार नाही ही भाषा वापरत आहेत. मुळात तुमच्या घरातल भांडण, तुम्हाला आमदारांपेक्षा राष्ट्रवादी व पवारसाहेब प्रिय. यात महाराष्ट्राला कशाला घेता? जनादेशाचा अपमान करून विश्वासघात तुम्ही केला हे महाराष्ट्र विसरला नाही”, असे ट्विट भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.

असाही टोला केशव उपाध्ये यांनी लगावला होता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधत बंड आमदारांवर टीका केली होती. यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी प्रतिटीका केली होती. “आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का?”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. याद्वारे किती खुबीने भावी शिवसेनाप्रमुख जाहीर करून टाकला. असा टोला केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत लगावला होता.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!