🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक अट ठेवत ‘मी राजीनाम देणार’ असल्याचे सांगितले. या पाश्वर्भूमीवर नाना पाटोले यांनी ट्विटद्वारे भाजपवर टीका केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल जनतेशी संवाद साधला. यावेळी “ज्यांना मी नको आहे, त्यांनी तसे येऊन सांगावे किंवा फोनवर बोलावे”,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले. या पाश्वर्भूमीवर नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात जे सत्तेचे महाभारत होत आहे, ते भाजपाचे षडयंत्र आहे हे स्पष्ट आहे”,अशी टीका भाजपवर नाना पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्रात जे सत्तेचे महाभारत होत आहे ते भाजपाचे षडयंत्र आहे हे स्पष्ट आहे !#Maharashtra pic.twitter.com/bFgSLzUxij
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 23, 2022
नाना पटोले असेही म्हणाले –
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय मा. उद्धव ठाकरे घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल.#Maharashtra pic.twitter.com/JbGio5gxli
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 23, 2022
“मा. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असण्याबाबद कॉंग्रेसचा अजिबात विरोध नाही. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय मा. उद्धव ठाकरे घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल”, असे नाना पटोले यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
