🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिकच गडद झाले आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत खळबळ उडाली आहे. सकाळी उद्धव ठाकरेंचे उजवे हात असलेले एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह सुरतमध्ये गेले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर गेले होते. मात्र या भेटीला यश आले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा आणि भाजपासोबत या, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसमोर ठेवला.
एकनाथ शिंदे जवळपास 30 पेक्षा जास्त आमदार घेऊन सुरतमधील मेरेडीयन हॉटेलमध्ये आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे रात्रीच सुरतला रवाना झाले होते. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी अट उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवली आहे. त्यांची नाराजी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत आहे.
तसेच एकनाथ शिंदे ज्या हॉटेलमध्ये त्यांच्या समर्थकांसह राहत आहेत. त्या हॉटेलमध्ये भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यालाही पाठवण्यात आले आहे. जे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारला धोका नसल्याचे सांगितले. तसेच शिंदे यांची नाराजी हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगून ते म्हणाले की, ही काही पहिलीच वेळ नाही, याआधीही असा प्रयत्न दोनदा झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
