🕒 1 min read
मुंबई : आज राज्याच्या राजकीय वर्तुळ खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरील नाराजीच्या बातम्यानंतर ते नॉट रिचेबल झाल्यानं राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला आहे.
मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांची या सर्व घडामोडींवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री पद घेण्यापेक्षा मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. त्यांनी शिवसेनेत परत येऊन मुख्यमंत्री बनावं, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली असल्याचं वृत्त न्युज 18 लोकमतने दिल आहे.
तसेच पुढे मी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी ही भूमिका घेतली होती. वर्षा बंगल्यावर आपल्या खाजगी सहकार्यांसोबत केलेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली ही भूमिका सांगितल्याचं समजतंय. तसेच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने सर्व आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा वर्षा बंगल्यावर बोलावले होते. मात्र या बैठकीला ५५ पैकी केवळ १८ शिवसेना आमदार उपस्थित होते, अशी माहिती समोर आली होती.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच सध्या ३ मंत्री नॉट रिचेबल आणि १३ आमदार असल्याचीही माहिती समोर आली होती. हे सर्व आमदार आणि मंत्री हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
