Share

“मेहबूब शेख विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर, बॅग भरून पैसे दिले” ; तरूणीचा खुलासा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरील कथित बलात्काराच्या आरोप प्रकरणात एक मोठे ट्विस्ट आले आहे. आता या प्रकरणासंबंधी एक मोठी बातमी समोर येत आहे. शेख यांच्यावर आधी बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने आता थेट घुमजाव केला आहे. त्यामुळे या प्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले आहे. आता हे प्रकरण पूर्वी ज्यांनी लावून धरला त्या भाजपचा नेत्या चित्रा वाघ यांच्यावरच उलटणार असे दिसत आहे. या प्रकरणी चित्रा वाघ यांच्याविरोधात आता तक्रार करण्यात येणार आहे.

भाजपाच्या चित्रा वाघ आणि आमदार सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार मी मेहबूब शेख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असे पीडित तरुणीने म्हंटले आहे. मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नदमोद्दीन याने बीडमध्ये सुरेश धस, चित्रा वाघ आणि जिया बेग नावाच्या व्यक्तीसोबत भेट घालून दिली. त्यांनतर बेग याने पोलिसांनी त्रास देऊ नयेत आणि मुंबईत राहण्याची व्यवस्था करण्यासाठी बॅग मध्ये पैसे दिले असल्याची माहिती तरुणीने दिली आहे. याप्रकरणी तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नदमोद्दीन शेख आणि विशाल खिलारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रतिक्रीया दिली आहे. ‘राष्ट्रवादीच्या मेहबूब शेखने माझ्यावर बलात्कार केला मला मदत करा असं आमच्याकडे सांगत आलेल्या पीडितेने घुमजाव करत गुन्हा दाखल करण्यास आम्हीचं भाग पाडलं म्हणत तक्रार केली आहे, हे आताचं माध्यमातून कळल ज्या केसेसमध्ये राजकीय धेंड असतात तिथे असं होणं अगदी स्वाभाविक सगळ्या चौकशींना मी तयार आहे. आम्ही त्या मुलीला मदत केली आहे. आम्ही चौकशीला जायला तयार आहे. असे अनुभव येत असतात तरीही आम्ही घाबरणार नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या तरुणीने १४ नोव्हेंबर २०२० रोजी रामगिरी हाॅटेल जवळील एका महाविद्यालया जवळच्या निर्मनुष्य जागेवर कारमध्ये मेहबूब इब्राहीम शेख याने अत्याचार केल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले होते. यावरून सिडको पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!