Share

IND vs IRE : आयर्लंड दौर्‍यावर राहुल त्रिपाठीचं भारतीय संघात पदार्पण होणं कठीण, माजी खेळाडू म्हणाला…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारताला २ टी-२० सामने खेळायचे आहेत. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असेल. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या मालिकेसाठी उपलब्ध नाहीत. हे खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणार आहेत. ऋषभ पंतही कसोटी संघाचा भाग असल्याने पंड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असावी. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. या मालिकेसाठी राहुल त्रिपाठीचीही संघात निवड झाली आहे.

३१ वर्षीय राहुलने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी शानदार फलंदाजी केली. त्यामुळेच त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. आयपीएल २०२२ हा राहुलच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम हंगाम होता. या हंगामात त्याने १४ डावात १५८.२४ च्या स्ट्राईक रेटने ४१३ धावा केल्या होत्या. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत राहुलला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. भारत आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात एकाच संघाला सोबत घेऊन खेळला आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने सांगितले की, राहुल त्रिपाठीसाठी आयर्लंड दौऱ्यावर पदार्पण करणे कठीण आहे. आफ्रिका मालिकेत संधी न मिळालेल्या खेळाडूंना आयर्लंडविरुद्ध खेळवले जाईल, असे आकाश चोप्रा ला वाटते. चौथ्या टी-२० दरम्यान स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणात आकाशने सांगितले की, दीपक हुडा आणि व्यंकटेश अय्यर यांना अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयर्लंड दौर्‍यावर संजू सॅमसनलाही संधी मिळणे कठीण असल्याचे आकाशने सांगितले. भारतीय संघ २६ आणि २८ जून रोजी आयर्लंडविरुद्ध टी-२० सामना खेळणार आहे.

आयर्लंड मालिकेसाठी भारतीय संघ-

हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!