🕒 1 min read
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाज दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजने कार्तिक बाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने मान्य केले की कार्तिक पूर्ण लयीत असताना त्याला गोलंदाजी करणे खूप कठीण आहे. कार्तिकने राजकोटमध्ये त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे. या सामान्यत त्याचे संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. भारताच्या डावातील १७ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या केशव महाराज याच्या विरुद्ध कार्तिकने तीन चौकार मारले. या अनुभवी फलंदाजाने त्याच्याविरुद्ध वेगवेगळी शैली वापरून चौकार मारले आणि हे पाहून महाराजलाही आश्चर्य वाटले.
सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाराज याने कार्तिकचे वर्णन सर्वोत्तम फिनिशरांपैकी एक आहे असे केले. तो म्हणाला की, “तो (कार्तिक) ज्या भूमिकेत आहे त्यात तो दमदार लयीत आहे. तो नक्कीच क्रिकेट खेळातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक आहे. तो मैदानात सगळीकडे धावा करतो ज्यामुळे त्याला गोलंदाजी करणे कठीण होते. कार्तिक आयपीएलमधील मुख्य परफॉर्मर्सपैकी एक का होता हे आम्ही पाहिले. त्याने आज आपला क्लास दाखवला आणि उत्कृष्ट खेळ केला.”
दिनेश कार्तिकने पहिले टी-२० अर्धशतक झळकावले
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची फलंदाजांची वरची फळी स्वस्तात बाद झाली. त्यामुळे १३व्या षटकापर्यंत संघाची धावसंख्या ८१/४ झाली होती. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कार्तिकने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने मैदानात सर्वत्र फटके खेळले. अशा प्रकारे त्याने आणि हार्दिक पंड्या (४६) यांनी मिळून भारताला संकटातून बाहेर काढले. कार्तिक २७ चेंडूत ५५ धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने भारतासाठी पहिले टी-२० अर्धशतकही झळकावले. भारताने २० षटकांत ६ बाद १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ८७ धावा करून बाद झाला. या दोन्ही संघातील टी -२० मालिका आता २-२ अशी बरोबरीत आहे. आता १९ जूनला बंगळुरू येथे खेळला जाणार पाचवा सामना निर्णायक आहे. हा पाचवा सामना या मालिकेचा विजेता ठरवेल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
