🕒 1 min read
अहमदनगर : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकाच्या निकालावरून राजकारण चांगलेच रंगताना दिसून येत आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिक्रियांनी सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. या निवडणुकीवर अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतेही विधान केले नाही. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार यांना पुन्हा भाजपसोबत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
“विखे पाटील आणि पवार कुटुंबियांत कोणताही वैयक्तिक संघर्ष नाही. आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. त्यातून राजकीय मतभिन्नता आहे, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा भाजपसोबत येण्याचे निमंत्रण दिले. तसेच देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते आहेत, तर अजित पवार शिस्तप्रिय आणि कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत लवकर येण्याचा निर्णय घ्यावा, असेही विखे पाटील म्हणाले.
विखे पाटील यांच्या आगामी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन लोणी इथल्या प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाने केले होते. यावेळी विखे-पवार कुटुंबातील संघर्षाविषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले , आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. राजकारणात अशी मतभिन्नता असतेच. आम्ही आमच्या वडिलांच्या विचाराने पुढे जात आहोत.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
