🕒 1 min read
मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज (१३ जून) वाढदिवस आहे. यानिमित्तच भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सुशांत सिंह याने २०२० साली आत्महत्या करून स्वतःचे आयुष्य संपवले होते.
“आज १३ जून आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे तर १४ जून २०२० सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू. १३ जून २०२० रात्री १ वाजता पार्टी झाली ज्या पार्टीमध्ये बरच काही घडलं/बिघडलं. ७० दिवसांच्या सारवासारव नंतर सीबीआयला एंट्री मिळाली तोपर्यंत सगळे पुरावे नष्ट करण्यात आले होते. एक ना एक दिवस सत्य बाहेर येणार.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
आज १३ जून पेंग्विनचा वाढदिवस
१४ जून २०२० सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू१३ जून २०२० रात्री १ पार्टी झाली ज्या पार्टीमध्ये बरच काही घडलं/बिघडलं, ७० दिवसांच्या सारवासारव नंतर सीबीआयला इंट्री मिळाली तोपर्यंत सगळे पुरावे नष्ट करण्यात आले होते. एक ना एक दिवस सत्य बाहेर येणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 13, 2022
दरम्यान अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी दिशाने घराच्या बाल्कनीतून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवले होते. यानंतर दिशाच्या आत्महत्येची चौकशी सुरु होऊन दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का? याबाबत चौकशी केली जात होती. त्यात दिशावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली, असा संशय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला होता. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावरच आज निलेश राणे यांनी पुन्हा एकदा हा विषय समोर आणला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे…”, निलेश राणेंचा संजय राऊतांना टोला
- “..पण त्यामुळे आकाश कोसळले काय?”, आगामी विधान परिषद निवडणुकीवर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- IND vs SA 2022 : हेनरिक क्लासेनची ‘क्लास’ खेळी; दक्षिण आफ्रिकाचा ४ गडी राखून विजय
- ENG vs NZ : नाद नाद नादच..! जो रूटनं पुन्हा ठोकलं शतक; विराट आणि स्मिथची केली बरोबरी!
- IND vs SA : भारताचं दक्षिण आफ्रिकेला १४९ धावांचं लक्ष्य; ‘फिनिशर’ दिनेश कार्तिकची महत्त्वपूर्ण खेळी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
