Share

अभिनेत्री नयनताराने लग्नानंतर शेअर केला ‘पहिला’ फोटो

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आज विवाहबंधनात अडकली आहे. दिग्दर्शक विग्नेश शिवनला याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. यांचा लग्नसोहळा महाबलीपुरममध्ये पार पडला. या लग्नाला दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. नुकताच नयनतराने तिच्या इंस्टाग्रामवरून लग्नाचा पहिला फोटो शेअर केला आहे. चाहते या फोटोला भरभरून प्रेम देत आहेत.

या लग्न सोहळ्याला बॉलीवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान याने हजेरी लावली. शाहरुखने काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. आता हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर लग्नासाठी अभिनेते रजनीकांत यांनी सुद्धा हजेरी लावली. नयनतारा आणि विग्नेश या दोघांनी ‘जेड बाय मोनिका’ या प्रसिद्ध फॅशन डिजायनरने डिझाईन केलेला पोशाख  घातला आहे.

https://www.instagram.com/p/CelDHlah6G1/

माहितीनुसार, लग्नाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. ज्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांना लग्नाआधी विशेष कोड दिला होता. हा कोड दाखवल्यानंतरच लग्नामध्ये प्रवेश देण्यात येत होता. यांचा लग्नसोहळा चेन्नईतील महाबलीपुरम या ठिकाणी पार पडला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!