Share

“…हिंदुत्व सोडल्यावर बोलतील हे यांना का वाटू लागलं?”, अमित ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (८ जून) औरंगाबाद जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित केले. याच मैदानात गेल्या महिन्यात राज ठाकरेंनी गर्जना केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षांच्या नजरा मुख्यमंत्र्यांच्या या सभेकडे लागल्या आहेत होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामकरणावर मोठे वक्तव्य केले. यावरूनच मनसे नेते अमित ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

“छत्रपती संभाजी महाराज टकमक टोकावर घेऊन जातील हे राष्ट्रवादी, काँग्रेसच्या साथीने सत्ता टिकवल्यानंतर हिंदुत्व सोडल्यावर बोलतील हे यांना का वाटू लागलं?”, असा सवाल अमित ठाकरे यांनी ट्वीट करत केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो. मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील. संभाजीनगर नामकरण हे वचन माझ्या वडिलांनी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आहे. त्याचा विसर पडणे शक्य नाही. नामकरण मी करेन तेंव्हा छत्रपती संभाजीराजे यांना अभिमान वाटेल असे शहर मी घडवुन दाखवेन.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!